तो असेल 18 वर्षांचा,नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला,ती 15 वर्षांची..नवथर अल्लड तरूणी.एकाच परिसरातच नव्हे तर एकाच आळीत राहणारे...त्याच्या घराच्या चार घरे पुढे तिचे घर येता जाता पायाच्या टाचे पर्यंत लांब केस,जन्मजात लाभलेले अप्रतिम लावण्य त्याच्या नजरेस पडे.तिला ही हा खूप प्रेमळ,आई वडिलांना मानणारा,अभ्यास सोडून बाकी बाबतीत पुढे असलेला,पण चारचौघांपेक्षा वेगळा असलेला तरूण पाहण्यात होताच.एकाच आळीतले म्हणून ओळख होतीच.पण त्याला ती मनापासून आवडली होती,आणि त्याने एकदा आपले प्रेम तिच्याकडे व्यक्त केले.तिने ही होकार दिला आणि एक प्रेम कहाणी फुलू लागली.दोघांचीही वये लहान.आणि मग अशा वयातल्या प्रेमाचे जे काही होते ते त्यांचे ही झाले. प्रेमाच्या आणा भाका झाल्या,कधी दूर रहावे लागले तरी प्रेम होतेच.लग्न ही झाले लवकर....दोघांच्याही घरची परवानगी नव्हती....आळंदीत मामाच्या सक्षिने दोघे एकमेकांचे झाले.पुढचे कसलेही विचार नव्हते..संसार कसा करायचा याचे काही त्रैराशिक मांडले नव्हते.पण आता एकमेकांची साथ आहे हे नक्की केले होते.ती त्याच्यापेक्षा हुशार तर तो बोलण्यात हुशार पण शिक्षणात कमी त्यामुळे सुरुवातिचा काळ खूप कठीण होता.प्रेमाची धूंदी उतरून व्यवहार सुरु झाला.कुरबुरी झाल्या...आपल्यावर प्रेम करणारा करणारी ती हीच? तो हाच? प्रश्न पडू लागले....प्रेम करणे सोपे पण निभावणे कठीण...जाणवू लागले...तिने स्वात:ला त्या घरात जूळवून घ्यायला सुरुवात केली....घरातली माणसे खूप चांगली 3 बहिणी आणि हा एकच भाऊ सासू सासरे..सगळ्यांचे स्वभाव भिन्न पण प्रेमळ...जमवले तिने...नव्या जीवाची चाहुल लागली होती पण त्याच्या नोकरीचे काही होत नव्हते...मेव्हण्याने मदत केली एक व्यवसायाची सुरुवात करून दिली....त्याने स्वत:ला झोकून दिले.तिने ही शिक्षकी पेशा स्विकारला आणि खरया अर्थाने संसाराची गाडी मार्गी लागली....अल्लड प्रेम मागे राहिले आणि जोडीदारा प्रती वाटणारे आदराचे जिव्हाळ्याचे प्रेम वाढीस लागले....लहान वयात तिच्याकडे मातृत्व आले...सुरुवातीला ती भांभावली होती...पण मातृत्वाच्या जबाबदारीने तिला खूप काही शिकवले..तिला घडवले....तिला ठाशीव व्यक्तिमत्व दिले....त्याचमुळे दुसर्या अपत्याविषयी ती ठाम होती. त्याचा ही जम बसला होता... आणि ते दोघेही एका अल्लड प्रेमी जोड्यामधून एक जबाबदार जोडप्यामध्ये रुपांतरीत झाले.दोघांमधले प्रेम तर जुन्या मधाप्रमाणे सरत्या वर्षां गणिक अधिक घट्ट आणि गोड होत आहे.आज तर त्यांचा लग्नाचा 25वा वाढदिवस...जुन्या कडू गोड आठ्वणीना उजाळा देत सर्व आप्त्स्वकीयांच्या उपस्थितीत साजरा करतायत दोघे.....आपल्या नम्र आणि लाघवी वागण्याने,बोलक्या स्वभावाने त्यांनी केवळ कुटूंबियांचेच नव्हे तर अनेकांचे मन जिंकले आहे...खूप मोठा मित्रपरिवार आहे त्यांचा.दोन्ही मुले आपल्या आई वडिलांसारखीच लाघवी आणि हुशार...मोठा मुलगा आता पुढिल शिक्षणासाठी अमेरिकेला निघालाय....२५ वर्षे लग्नाची आणि त्याआधी प्रेमाची सगळ्याचे सार्थक झाले...भांडले एकमेकांशी पण प्रेम कमी नाही होऊ दिले.कुटुंबाला धरून राहिले...अण्णा आणि वहिनी तुम्हाला दोघानाही लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि तुमच्यावर सौदागर चित्रपटातले लताबाईंनी गायलेले अजरामर गाणे अगदी फिट्ट बसेल
तेरा मेरा साथ रहे ,तेरा मेरा साथ रहे....
धूप हो छाया हो दिन हो के रात रहे....
Sunday, July 26, 2020
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नीतू ताई
खरे तर ती चव्हाण कुटुंबातले शेंडफळ चार भावंडातली धाकटी बहीण आणि शेंडफळ म्हटले की खूप लाड होतात हा सर्वसाधारण समज आहे तिच्या बाबतीत तो काही अंशी खरा ही असेल,पण या चार ही भावंडानी आपल्या आई बाबांच्या मागे घर ही व्यवस्थीत सांभाळले हे कुणीही नाकारू शकत नाही आई-वडील दोघेही नोकरी करायचे, घरात चार भावंडं,परिस्थिती बेताचीच.त्यामुळेच असेल की काय या भावंडाना फार लवकर परिस्थितीची समज आली.कधी ही कसली तक्रार नाही आई वडिलांकडे उगीच हट्ट नाही.सदैव आनंदी.स्वभावाने तर ही चार ही भावंडे इतकी प्रेमळ की कधी कधी या प्रमाने जीव गुदमरतो.डोळ्यांत पाणी येते.तिचे लग्नही लवकर झाले.कर्तुत्ववान पण अत्यंत मनस्वी नवरा लाभला तिला. लक्ष्मीच्या पावलाने ती
साटम कुटुंबात आली आणि तिच्या येण्याने त्या घराची नेहमी भरभराट झाली. संसार म्हटला की कपातली वादळं आलीच आणि आयुष्य म्हटलं तर चढ उतार येणारच. या सर्वांमध्ये तिने आपल्या मनाचा तोल कधीच ढळू दिला नाही.साटम कुटुंबात तर अशी सामावलीय जणू दुधात साखर.आजवरच्या जीवनप्रवासात ती तरून गेली कारण लग्नानंतर तिने आत्मसात केलेला सर्वात महत्त्वाचा गुण आणि तो म्हणजे संयम.खूप कमी बोलते ती,खूप शांत असते याचा अर्थ तिच्या मनात भावनांची आंदोलने नसतात असं नाहीये. खूप विचार तिच्या डोक्यात. तिच्यावरही तिच्या संयमाची परिक्षा पाहणारे क्षण आले,पण ती प्रत्येक परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तिर्ण झालीय.नीतू ताई आज तुझा वाढदिवस आणि तुझा लहान भाऊ म्हणून मी एकच सदिच्छा व्यक्त करतो कि संयम कधी सोडू नकोस.तुला पुढच्या आयुष्यातही तुला तोच तुला साथ देणार आहे. मागे वळून बघू नकोस आणि पुढे काय होणार याचा विचार करू नकोस.वर्तमानाचा आनंद घे. इंग्रजीत एक वचन आहेे yesterday was history, Tommorrow is mistory but Today is the gift,that's why it is called PRESENT".
जास्त विचार न करता समोर आलेले आयुष्य मनापासून जग एवढीच सदिच्छा!!!
Happy Birthday to you ताई
साटम कुटुंबात आली आणि तिच्या येण्याने त्या घराची नेहमी भरभराट झाली. संसार म्हटला की कपातली वादळं आलीच आणि आयुष्य म्हटलं तर चढ उतार येणारच. या सर्वांमध्ये तिने आपल्या मनाचा तोल कधीच ढळू दिला नाही.साटम कुटुंबात तर अशी सामावलीय जणू दुधात साखर.आजवरच्या जीवनप्रवासात ती तरून गेली कारण लग्नानंतर तिने आत्मसात केलेला सर्वात महत्त्वाचा गुण आणि तो म्हणजे संयम.खूप कमी बोलते ती,खूप शांत असते याचा अर्थ तिच्या मनात भावनांची आंदोलने नसतात असं नाहीये. खूप विचार तिच्या डोक्यात. तिच्यावरही तिच्या संयमाची परिक्षा पाहणारे क्षण आले,पण ती प्रत्येक परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तिर्ण झालीय.नीतू ताई आज तुझा वाढदिवस आणि तुझा लहान भाऊ म्हणून मी एकच सदिच्छा व्यक्त करतो कि संयम कधी सोडू नकोस.तुला पुढच्या आयुष्यातही तुला तोच तुला साथ देणार आहे. मागे वळून बघू नकोस आणि पुढे काय होणार याचा विचार करू नकोस.वर्तमानाचा आनंद घे. इंग्रजीत एक वचन आहेे yesterday was history, Tommorrow is mistory but Today is the gift,that's why it is called PRESENT".
जास्त विचार न करता समोर आलेले आयुष्य मनापासून जग एवढीच सदिच्छा!!!
Happy Birthday to you ताई
आद्य क्रांतीसूर्य
1911 सालातली गोष्ट असावी!! भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचे म्हणजेच इंग्रजांचं राज्य होतं अनेक स्वातंत्र्यसेनानी मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, झगडत होते, प्राणांची आहुती देत होते.त्यातल्याच एका अशा तेजस्वी क्रांतीसूर्याला अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा झाली; तीही किती??? तर पन्नास वर्षांची!! जेव्हा हा कैदी अंदमानच्या जेलमध्ये पोहोचला, त्याला खीजवण्यासाठी तत्कालीन जेलप्रमुखाने त्याला म्हटलं "काय आता पन्नास वर्षे खितपत पड या अंदमानच्या जेलमध्ये". पण त्या प्रखर देशभक्ताने आपले तेजस्वी डोळे त्या इंग्रजावर रोखले आणि म्हणाला पन्नास वर्ष?? अरे तेवढी वर्ष तुमचं राज्य तरी टिकेल काय?? एवढा प्रखर देशाभिमान, हिंदुत्वाबद्दल असलेली जाज्वल्य निष्ठा!!! असा दुसरा क्रांतीसुर्य होणे नाही!! त्या
क्रांतीसूर्याचे नाव म्हणजे विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर. या आद्य क्रांतीसूर्याला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने माझे विनम्र अभिवादन!!! "झाले बहु,होतील बहु,परंतु या सम हाच"!!!
क्रांतीसूर्याचे नाव म्हणजे विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर. या आद्य क्रांतीसूर्याला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने माझे विनम्र अभिवादन!!! "झाले बहु,होतील बहु,परंतु या सम हाच"!!!
मित्रा फसवलेस....
जगातील सर्वात दुख:द घटना कुठली असावी तर एखादा आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्याला श्रद्धांजली द्यावी लागते तो.आज तो क्षण माझ्या आयुष्यात आलाय!! माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या माझ्या एका जवळच्या मित्राला मला श्रद्धांजली द्यावी लागेतेय. हा क्षण कधी येऊच नये असं वाटलं होतं पण काळापुढे कोणाचं चालत नाही.काळच सर्वांना वेदना देतो आणि आणि त्या वेदनेवर फुंकर ही काळच घालत असतो. आमच्या भाजप (विलेपार्ले) परिवारातले महत्त्वाचे सदस्य माननीय श्री अभिषेक भार्गव ज्यांना आम्ही प्रेमाने अबू म्हणायचो त्यांचे आज दुर्दैवी निधन झालं. फार लवकर त्याने हे जग सोडून जाण्याची घाई केली.त्याने अजून वयाची चाळिशीही ओलांडली नव्हती. पण या लहान वयातही त्याने बरेच काही साध्य केलं होते.तो एक यशस्वी उद्योजक होता. भारतीय जनता पार्टी मध्ये त्याने फार लवकर कामाला सुरुवात केली आणि आपल्या अंगभूत गुणांमुळे तो फार लवकरच प्रभाग क्रमांक 85 चा अध्यक्षही बनला होता.तिथेही त्याने खूप चांगली कामगिरी करून दाखवली होती. परागजींच्या निवडणुकीच्या काळात,ज्योतीवहिनींच्या निवडणुकीच्या काळात अभिषेकने खूपच भरीव कामगिरी केली होती. पार्ले महोत्सवाच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या काही मोजक्या कार्यकर्त्यांपैकी तो एक होता.गेले कित्येक वर्ष पार्ले महोत्सवाच्या नृत्यस्पर्धेचा प्रमुख म्हणूनही त्याने उत्तम कामगिरी बजावली होती.आपला मुद्दा (भलेही तो चुकीचा का असेना!! )पण रेटून तो कसा खरा आहे हे पटवण्यामध्ये त्याचा हात कोणीच पकडला नसता.माईक न घेताही मैदानाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाईल एवढा भारदस्त आवाज होता त्याचा.आज तो आपल्यात नाही ही कल्पना खरं तर अशक्य वाटते आहे पण हेच वास्तव आहे.अभिषेक मित्रा तुझ्या मृतात्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुझ्यासाठी "तुला भावपूर्ण श्रद्धांजली" हे शब्द लिहावे लागतील असा कधी वाटला नव्हते,, पण ती वेळ आमच्यावर आली आहे,याचं दुःख फार मोठे आहे....
आभार
आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी खरच खुप सर्वांचा ऋणी आहे आणि भारावून गेलोय.🙂 माझे अत्यंत आवडते लेखक आणि महाराष्ट्राचे दैवत पु.ल. देशपांडे यांनी असे लिहून ठेवले आहे की माणूस किती श्रीमंत आहे हे त्याच्याकडे असलेल्या धन दौलतीने मोजू नका त्याने कमावलेल्या माणसांनी मोजा असं मानलं तर खरच मी खूप श्रीमंत आहे, की मला अशी प्रेमळ माणसे मिळाली आहेत. आपली पूर्वपुण्याई जबर असल्याशिवाय अशी माणसे भेटणे केवळ अशक्य आहे.माझा पार्ले मित्र परिवार ,माझ्या जुन्या ऑफिसमधले माझे सहकारी, माझ्या बालमोहन शाळेतले माझे मित्र मैत्रिणी,माझ्या कॉलेजचे माझे मित्र मैत्रिणी, माझे नातेवाईक, आप्तेष्ठ ज्यांनी मला मनापासून शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी आभार मानतो.मी खरच स्वतःला भाग्यवान समजतो.कारण मला सर्व स्तरातले,वयोगटातील मित्र मिळाले मग ते ऐंशीची झुळुक लागलेले किरणे काका असोत व नुकतीच साठी ओलांडलेले शहाणे काका असोत,दादा भिसे असोत वा ज्याना मी आदराने गुरुजी म्हणतो ते आमचे चरण सर असोत.किंवा आज सकाळी सकाळी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेला माझ्या इमारतीचा आमचा नेपाळी वाचमन करण बहादूर असो. या माझ्या सर्व मित्रांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. कारण या वर्षी माझ्या वाढदिवसाला दुःखाची दुहेरी किनार होती.पहिली म्हणजे जगात पसरलेला करोना आणि दुसरा केवळ वीस दिवसांपूर्वी माझ्या पार्ले परिवारातील एक उमदा सदस्य अभिषेक भार्गव ज्याला आम्ही प्रेमाने अबू म्हणायचो त्याचे झालेले अकाली निधन.पण तुम्ही मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा दिल्यात आणि माझा वाढदिवस माझ्या कायम स्मरणात राहील असा बनवलात.माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
त्रिकोणातला एक कोन
त्रिकोणाच्या नेहमी तीन बाजू असतात अशाच माझ्या माहितीतल्या घाग,मोरे आणि सूर्यवंशी या अभेद्य त्रिकोणाचा एक कोन म्हणजे श्री विश्वनाथ घाग म्हणजे आमचे सर्वांचे लाडके घाग काका यांचे आज दुर्दैवी निधन झाले. तसे हे वर्ष 2020 हे काही सुखद वर्ष नाहीच आहे. एकावर एक धक्के बसत आहेत पण हा धक्का निश्चितच अनपेक्षित होता कारण घाग काका तसे काटक होते,आनंदी होते.मला अजूनही आमच्या वैष्णोदेवी सहलीतले,सर्वांना सांभाळून घेणारे,सगळ्यांची काळजी करणारे,आनंदी घाग काका आठवतात.आपल्या तिन्ही मुलांवर निरतिशय प्रेम करणारे असे आमचे काका.नुकताच त्यांना नातू झाला होता.खूप आनंदात होते ते.
घाग,सूर्यवंशी आणि मोरे हे अद्वैत अगदी जुने. या तिघांची मैत्री चाळीस वर्षांपेक्षाही जुनी असावी.एकाच कार्यालयातले हे तिघे.राहायचे ही एकत्रच. एकाच वडाळा विभागातल्या कार्यालयीन निवासी संकूलात.नंतर निवृत्तीनंतरही नेहमी एकत्रच राहिले. आजही बदलापूरमध्येही हे तिघेही एकाच इमारतीत राहतात. एवढी जुनी मैत्री एवढा जुना ऋणानुबंध.पण नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही हे मात्र खरे.
घाग,मोरे आणि सूर्यवंशी या अभेद्य त्रिकोणातला एक कोन आज कायमचा भंगला.घाग काका तुम्ही आमच्या मनात तुमच्या चांगल्या आठवणींच्या रुपाने सदैव राहाल.
तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली...
We All Miss You....
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विवेकजी
व्यवसायाने सनदी लेखापाल असल्याने सतत आकड्यांच्या खेळात गुंतलेले असतानाही अजिबात रूक्ष न झालेले, स्वभावाने खेळकर, प्रवृत्तीने शिक्षक असलेले आमचे मित्र माननीय विवेक रानडे ज्यांना सर्व त्यांचे मित्र परिवार प्रेमाने रॉनी असे म्हणतात त्यांचा आज वाढदिवस.विवेकजींची आणि माझी मैत्री झाली आमचे एक मित्र श्री गुरुचरणसिंग संधू यांच्यामुळे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत घडलेले विवेकजी तसेच शिस्तशीर आहेत आणि संघाशी संबंधित असलेला माणूस हा सदैव गंभीर असतो असा एक उगीचच (गैर)समज आहे. असा (गैर)समज कदाचित विवेकजींच्या बाबतीतही असावा; पण या माणसाच्या चेहऱ्यावर सतत एक मिश्किल हसू विलसत असते.बोलता-बोलता कधी समोरची विकेट काढतील सांगता येणार नाही. 2019 मध्ये आम्ही GST कार्यशाळेचे आयोजन केले होते.एक महिन्याची ती कार्यशाळा होती त्याच्यामध्ये काही वर्ग विवेकजींनी घेतले आणि मीही त्या कार्यशाळेचा एक भाग असल्याने एक शिक्षक म्हणून विवेकजी किती चांगले आहेत याचा मला अनुभव मिळाला आणि आपल्या विषयात त्यांची काय जबरदस्त पकड आहे हे त्यावेळी जाणवलं.GSTसारखा क्लिष्ट विषय त्यांनी अतिशय खेळकरपणे समजावून सांगितला.शिकवीत असताना मध्येच एखाद्याने प्रश्न विचारला तर मात्र त्यांना अजिबात आवडत नसे.त्यांचे म्हणणे असे की मी शिकवून झाले की तुम्ही प्रश्न विचारा किंवा त्यांच्याच वर्गातला एखादा विद्यार्थी दुसऱ्या कोणाला ते शिकवत असताना एखादा भाग समजला नसेल तर सांगत असेल तर तेही त्यांना आवडत नसे आणि त्यांचे म्हणणे रास्त होते.कारण असे परस्पर विद्यादान झालेले त्यांना पटत नसे आणि मग ते रुद्रावतार धारण करीत, पण तोही लोभस असे. माझ्याशी त्यांची मैत्री केवळ 2 वर्षेच जुनी असेल पण ते माझ्याशी मी खूप त्यांचा जुना मित्र असल्यासारखे वागतात.खरेतर मी त्यांच्या वयाने खूप लहान आहे; हाही त्यांच्या स्वभावाचा एक भाग आहे. तर अशा आमच्या अष्टपैलू,हरहून्नरी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
Subscribe to:
Posts (Atom)